इनर इंजिनीयरिंग वॉल

परिवर्तनाच्या कथा!

तुमची कथा सांगा
Seema Akka avatar
Seema Akka
गुरू ब्रम्ह गुरू विष्णू गुरू देवो महेश्वर गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमः 🙏🙏🙏🙏 नमस्कार सद् गुरू,मी ऑगस्ट 2024ला Inner Enggerinering चा course online पूर्ण केले. सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून मी 4-6 ह्या वेळेत पूर्ण करायचे, नंतर सगळं काम झाले की आफिस 9-1 परत घरी आल्यावर सगळं काम करत रात्री 11 वाजेपर्यंत आवरायचं पण थोडा देखील थकवा, कंटाळा,आळस, त्रास होत नव्हता.उलट प्रचंड उत्साह, उर्जा निर्माण झाली होती आणि मन आनंदाने व समाधानाने भरून गेले होते.मी कोरोणा सुरू झाला तेव्हा सगळं काम आटोपून सद् गुरू चे व्हिडिओ मोबाईल वर कधी कधी पाहायचे.. त्यामुळे मन शांत व्हायचे, नंतर हळूहळू रोज मला थोडा वेळ व्हिडिओ पहायची इच्छा व सवय झाली, दररोज त्या माध्यमातून सद गुरू चे मार्गदर्शन मला मिळायचे. काय देते innnear engineering?? 1.तुम्हाला तुमच्या स्वतः शीच भेट घालून देते. 2.आयुष्यात लहान शाळेतील मुलांना सुध्दा राग,द्वैष, कमीपणा वाटते , माझ्या कडे ही वस्तू नाही, मार्क कमी मिळाले म्हणून, पळताना मागे राहिले म्हणून अशा अनेक गोष्टींचा विचार, मनात येतो आणि त्रास होतो तर तुम्हाला म्हणजेच मोठ्या वयाच्या मुलांना, तरूण मुलांच्या बाबतीत किती मनाची घुसमट होत असेल, आणि त्याही पेक्षा मोठे लग्न झालेल्या व्यक्तीचे आयुष्यात,जे आजोबा चे वयाच्या आहेत अशा ‌ सगळ्या चे मनात स्वतः चे स्वतः नीच खूप खूप प्रश्न,न सोडवता येणारया ईच्छा, अपेक्षा चे ओझे ईतर सर्व महत्त्वाच्या गोष्टींची यादी असते तर ह्या सगळ्या गोष्टी**************अत्यंत सुंदर व सोपी पध्दतीने तुम्ही हाताळून, तुमचं आयुष्य खूप खूप सुंदर, समाधानी, उत्साही वातावरणात बदल स्वतः चे मनाला एक संधी उपलब्ध करून inner Enggerinering करून नवीन फक्त वर्तमानकाळात आनंदी जगू शकतात त्यामुळेच @+++++++++innnear engineering+++++@ करायला हवे... सद् गुरू हे आई वडील जसं प्रत्येक लेकरांच्या भलं व्हावं म्हणून धडपड करतात तसेच ते आपल्या सगळ्या साठी सतत कार्यरत आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी प्रत्यक्षात खरा आनंद, समाधान, मिळावं हीच इच्छा.. आजच्या काळात घराघरात मोबाईल फोन, इंटरनेट ने लहान मुलां पासून मोठ्या वयाच्या लोकांना स्वतः चे जाळ्यात अडकवले आहे आणि त्यामुळे फक्त दिखाऊ आनंद फोटो पाठवून, लाईक मिळतात तेवढ्यात खुश,हे सगळं थोड्या वेळाने बदलतं.. आमच्या कम्प्युटर चे भाषेत सांगायचे तर RAM and ROM सगळे जण आता फक्त temporary happy राहतात, खरंच आनंद मिळतो का आनंदी आहेत हेच कळत नाही... पण इथं तुम्हाला Permanent Happiness मिळणार ही खात्री 100% आहे त्यामुळे परत एकदा विचार करा आणि लगेच inner Enggerinering करा बघा, तुम्ही तुमच्या सोबत एकदा नव्याने भेटाल.. सद् गुरू नेहमीच सांगतात ****निश्चल तत्वं जीवन मुक्ती****** नमस्कार......
Jan 23, 2025
Sayali bhogle avatar
Sayali bhogle
नमस्कारम.! माझ नाव सायली आहे. माझ innner engineering ऑगस्ट 2024 मध्ये झालं आहे. मी जेव्हा जेव्हा शांभवी करते मला खूप प्रसन्न वाटत. सगळ दुःख ,चिंता विसरलाय होत.मला ineer engineering केल्या नंतर नवीन जन्म मिळालाय. धन्यवाद सदगुरू!
Jan 18, 2025
Bharthi Thakare
Dilip sathe
Video transcript: So immediately. And then I did the course and then I went to. So he told me. You have crossed 70. How you can go? I have applied. Let me see. And then after one and a half months medicine, psychiatry and 25km cycling as a volunteer. I will give it to the HR people. They will decide. And then I didn't care. You can come as a volunteer. So that was my first experience. And this year also I'm going on 25th, 20th February to 3rd March. Decision making. Everything has been improved. Great. You feel like young man. Till my last day. Great. Thank you, Anna Pranam.

इनर इंजिनियरिंगमुळे स्पर्शून गेला आहात ?

तुमची कथा वॉलवर नोंदवा

इथे शेअर करा
Vaishali Chavan
Video transcript: Namaskar.
Ruperi Turi avatar
Ruperi Turi
नमस्कारम! माझं नाव रूपेरी. माझं इनर इंजिनिअरिंग एप्रिल 2023. इनर इंजिनिअरिंग झाल्या नंतर माझा राग कमी झाला. विचारांमध्ये स्पष्टता आली. एकाग्रता वाढली. उर्जेमध्ये वाढ झाली.
Jan 18, 2025
Vaishnavi Marne avatar
Vaishnavi Marne
नमस्कारम😊🙏 मी वैष्णवी मारणे. मे 2024 मध्ये inner engineering केल. शांभवी क्रिया सुरू केल्यापासून. खूप सकारात्मक आणि चांगले बदल झाले आहेत. वर्तमान काळात जास्त रहायला लागले आहे. जागरूकता आणि कृतज्ञता पाहिल्या पेक्षा वाढली आहे. मन खूप शांत होतं. धन्यवाद सधगुरू🙏😊❤️
Jan 13, 2025
शिवपाल सुरेश जाधव avatar
शिवपाल सुरेश जाधव
नमस्कार, मी शिवपाल सुरेश जाधव, मी जून 2023 मध्ये इंनर इंजिनियरिंग प्रोग्राम ऑनलाईन केला. त्यानंतर मी माझ्या उर्जेमध्ये एक नवीन जिवंतपणा अनुभव केला. ज्या मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी होत्या त्या कधी आणि कशा नाहीशा झाल्या मला समजलं देखील नाही. इंनर इंजिनियरिंग प्रोग्राम माझ्या आयुष्यातील सर्वांत मौल्यवान गोष्ट आहे, आणि मी सद्गुरुंचा खूप खूप आभारी आहे 🙏🏻😁
Jan 12, 2025
Aniket avatar
Aniket
इन्नर इंजिनिअरिंग ने माझे जीवन पूर्णतः बदलले आहे. मी प्रत्येक दिवशी खूप आनंदात असतो, बाहेरील कोणत्याच गोष्टींचा माझावर नकारात्मक परिणाम होत नाही. InnerEngineering हे माझासाठी पुनर्जन्म ठरले आहे. या साठी सद्गुरू आणि ईशा फाउंडेशन चे मनापासून आभार.
Jan 12, 2025
Pallavi ganesh shinde
Video transcript: Namaskar. Inner engineering. Where? Karna somehow. Thank you.
आनंदकुलकर्णी avatar
आनंदकुलकर्णी
नमस्कार, मी आनंद कुलकर्णी व्यवसायाने वकील आहे. दैनंदिन ताणतणावामुळे माझी झोप नीट होत नसे. स्वतःबद्दल मनामध्ये अनेक शंका निर्माण होत. पण शरीर आणि मनापासून काही काळ वेगळे होण्यामुळे खुप आत्मिक शांति मिळू लागली आहे. खरं तर प्रत्येक व्यक्ती व परिस्थिती ला समोर जाताना वेगळा दृष्टिकोन प्राप्त झाला आहे. पारिवारीक संबंधांत खुप सुधारणा झाली आहे. व्यवसायातील निर्णय ठामपणे व विवेकबुद्धी वापरून घेता येऊ लागले आहेत. एकंदरीत या प्रक्रियेने मनाची सजगता प्राप्त झाली आहे… सद्गुरूंचे शताश: धन्यवाद व वंदन..🙏
Dec 26, 2024
Amruta avatar
Amruta
नमस्कार माझे नाव अमृता सामंत, मी एक कवी गीतकार आहे. मला anxity चा व पॅनिक अटॅकचा त्रास होता. मला इनर इंजिनिअरिंग चा खूप लाभ झाला.मन आता बरेच शांत झाले आहे.स्थिरता आली आहे.माझा त्रासही कमी झाला आहे. सद्गुरुंचे आणि ईशा फाऊंडेशनचे मनापासून खूप खूप आभार आणि हृदयापासून नमन🙏🙏🙏 धन्यवाद.
Dec 26, 2024
सिद्धार्थ उगले  avatar
सिद्धार्थ उगले
नमस्कारम 🙏🏻, माझं नाव सिद्धार्थ उगले आहे. मला थोडा माझा अनुभव सांगायचा आहे. मी सध्या इयत्ता *12 वी maharashtra board* ला शिकत आहे. मला इनर इंजिनिअरिंग केल्यामुळे माझ्या अभ्यासामध्ये मला खूप मदत होत आहे. उदा. मला आधी एका जागेवर जास्त वेळ अभ्यासाला बसता येत नव्हतं आता मी जास्त वेळ अभ्यास करतो. आणि माझं focusing पण वाढलं आहे. आता मी जास्त आवडीने अभ्यास करत आहे.मी आधी छोट्या-छोट्या गोष्टी वरून चीड-चीड करायचो, आता माझ्यामध्ये स्थिरता आल्यासारखं मला वाटतं आहे. आणि माझी झोप पण कमी झाली आहे.आणि माझं रागावरती पण खूप नियंत्रण आलं आहे. खूप छान वाटत आहे, आतमधून एका वेगळं space निर्माण झालं आहे. मी कधी अशी कल्पना केली नव्हती कि असं काही असू शकतं. आणि मला हे समजलं आहे कि आनंद, दुःख, राग, प्रेम आणि नैराश्य हे सर्व कुठल्याही बाहेरच्या परिस्थिती वरून ठरत नाही. सर्व अनुभव हे आपल्या स्वतः च्या आत मधून होतात. म्हणजे याचाच अर्थ मी जर दुःखी असेल तर मला बाहेरची परिस्थिती ला दोष ने देता स्वतः वरती काम करण्याची गरज आहे. धन्यवाद 🙏🏻.
Dec 22, 2024